पुण्यातील सदाशिव पेठेत थरार : ‘या’ कारणावरून केला तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अ‍ॅसिड हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला. त्यानंतर शेजारच्या इमारतीमध्ये लपून बसलेल्या हल्लेखोरांने पोलीसांवरही गोळीबार केला. त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शहरातील मध्यवस्तीत तब्बल दोन ते अडीच तास हा थरार सुरु होता. सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी (२५, अक्कलकोट) असे असिड हल्ला करून आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तर रोहित खरात (२५, रा. सदाशिव पेठ) असे अ‍ॅसिड हल्ला झालेल्याचे नाव आहे.

नेमके काय घडले रात्री

मंगळवारी रात्री रोहित त्याच्या मैत्रिणीसोबत तो राहात असलेल्या ‘स्वप्नगंधा’ अपार्टमेंटसमोर उभा होता. त्यावेळी अचानक त्याच्यावर सिद्धराम कलशेट्टी याने असिड फेकले. त्यानंतर एकच धावपळ उडाली. त्याच्यावर असिड टाकून सिद्धराम पसार झाला. मात्र रोहित भाजला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रोहितला रुग्णालयात पाठवून पोलीस सिद्धरामचा शोध घेतल होते. एक ते दीड तास पोलिसांनी शोध घेतला. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. अचानक पोलिसांनी माहिती मिळाली की, तो शेजारच्याच इमारतीमध्ये लपून बसला आहे. पोलिसांनी तेथे शोध सुरु केला.पोलिसांना चारी बाजूने आलेले पाहून सिद्धराम बिथरला आणि पोलिसांवरही दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलीसांनी त्याला पकडण्याच्या आतच त्याने स्वत:ला गोळी मारली आणि इमारतीच्या डक्टमध्ये तो पडला. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्याचा मृतदेह काढून ससून रुग्णालयात दाखल केला.

‘या’ कारणावरून केला हल्ला

जखमी रोहितची आई ज्योतिष विशारद आहे. तर रोहित लॉ चा विद्यार्थी आहे. रोहितच्या आईसोबत सिद्धरामची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यावेळी त्याने फेसबुकवर अश्लील मेसेज पाठविल्याप्रकऱणी रोहितच्या आईने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखळ करून त्याला अटक केली होती. याचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच हा प्रकार घडला. दरम्यान, सिद्धरामच्या बॅगमध्ये आणखी काही हत्यारे असल्याचेही समजते. पिस्तूलासोबतच त्याच्याकडे चॉपर, कोयता असलण्याची शक्यता आहे. सिद्धराम मुळचा अक्कलकोटचा राहणारा आहे. तो अक्कलकोट येथून यासाठीच पुण्यात आला होता.

Loading...
You might also like