Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACP Transfer | सहायक पोलिस आयुक्त सुनिल विष्णू पवार यांची सिंहगड रोड विभागात नियुक्ती करण्यात (Pune ACP Transfer) आली आहे. ते यापूर्वी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत कार्यरत होते.

ACP सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या नियुक्ती बाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी काढले आहेत.
सिंहगड रोड विभागाच्या (Sinhagad Road Division) सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pornima Taware) या सध्या प्रदीर्घ रजेवर आहेत.
त्यांच्या जागी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ACP सुनिल पवार यांनी यापूर्वी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे.

ACP पौर्णिमा तावरे या रजेवरून हजर झाल्यावर त्यांच्या नियुक्ती बाबत चे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation |  पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

बदलला LPG घरगुती गॅस सिलेंडरशी संबंधित ‘हा’ नियम! बुकिंगचे टेन्शन झाले दूर, जाणून घ्या

Pune Crime | भाजपचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट; एका राजकीय पक्षाशी संबंधित तिघांवर गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune ACP Transfer | ACP Sunil Pawar appointed in sinhagad road division pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update