Pune ACP Transfer | एसीपी विजयकुमार पळसुले यांची गुन्हे शाखेत नियुक्ती ! ACP गलंडे यांची वाहतूक तर ACP देशपांडे यांची विशेष शाखेत नियुक्ती

पुणे : Pune ACP Transfer | महाराष्ट्र गुप्त वार्ता विभागातून पुणे शहर पोलीस दलात बदलून आलेले सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार वसंतराव पळसुले (Vijaykumar Palsule) यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची वाहतूक शाखेतून गुन्हे शाखेतील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत (EoW) सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली (Pune ACP Transfer) करण्यात आली आहे.

पुणे शहरात बदलून आलेल्या सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी मनोहर गलंडे (ACP Rukmini Manohar Galnde) यांची वाहतूक शाखेच्या (Traffic Branch, Pune) सहायक आयुक्तपदी नियुक्ती (Pune ACP Transfer) करण्यात आली आहे. तसेच नागपूर शहर येथून पुण्यात बदली झालेले सहायक पोलीस आयुक्त व्यंकटेश देशपांडे (ACP Vyankatesh Deshpande) यांची विशेष शाखेत (Special Branch) सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी हे आदेश काढले आहेत.

गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार (ACP Shivaji Pawar) यांची नाशिक (Nashik)
येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत बदली झाल्यापासून आर्थिक व सायबरचा अतिरिक्त कार्यभार (ACP EoW)
सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील (ACP Milind Patil) यांच्याकडे होता. मिलिंद पाटील हे सेवानिवृत्त झाले
आहेत. त्यामुळे विशेष शाखेत व्यंकटेश देशपांडे यांची नियुक्ती (Pune ACP Transfer) करण्यात आली आहे.

5 महिन्यानंतर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तपदी स्वतंत्र अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Anti Courruption | 2 कोटीचे लाच प्रकरण ! 50 लाखाची लाच घेताना राज्यातील ‘सत्ताधारी’ पक्षाच्या नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं; ACB ची मोठी कारवाई, राज्यात प्रचंड खळबळ

Jalgaon Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना महिला दक्षता विभागातील पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune ACP Transfer | ACP Vijaykumar Palsule appointed in EoW of pune police crime branch While ACP rukmini galnde in traffic branch and ACP vyankatesh deshpande in special branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update