Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACP Transfers | शहर पोलिस दलातील (Pune Police) कोथरूड विभागाचे (ACP Kothrud Division) सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेत एसीपी – 1 (क्राईम – 1) Crime ACP – I म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज (शनिवार) रात्री काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आदेश काढले आहेत. (Pune ACP Transfers)

 

गेल्या काही महिन्यांपासुन गुन्हे शाखेतील एसीपी क्राईम-1 हे पद (ACP Crime-I) रिक्त होते. अखेर आज कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांची गुन्हे शाखेत नियुक्ती (Pune Police Crime Branch) करण्यात आली आहे. त्यामुळे एसीपी क्राईम – 1 या पदावर कोण विराजमान होणार यासंबंधीच्या चर्चांना पुर्णविराम भेटला आहे. अत्यंत महत्वाचे मानले जाणार्‍या पदावर एसीपी गजानन टोम्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोथरूड विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी श्रीमती रूक्मिणी मनोहर गलंडे (ACP. Rukmini Manohar Galande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोनच दिवसांपुर्वी राज्य गृह विभागाने तब्बल 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती दिली होती. पुण्यात देखील काही सहाय्यक पोलिस आयुक्त नव्याने हजर होत आहेत. (Pune ACP Transfers)

 

आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या आणि नियुक्त्या पुढील प्रमाणे

1. चंद्रकांत आनंदा सांगळे ACP Chandrakant Ananda Sangale (ACP Lashkar एसीपी लष्कर ते एसीपी वाहतूक विभाग)

2. गजानन बाळासाहेब टोम्पे ACP Gajanan Balasaheb Tompe (ACP Kothrud एसीपी कोथरूड विभाग ते एसीपी क्राईम – 1)

3. बजरंग हिंदूराव देसाई ACP Bajrang Hindurao Desai (ACP Vishrambaug विश्रामबाग विभाग ते एसीपी हडपसर विभाग)

4. कल्याण दौलतराव विधाते ACP Kalyan Daulatrao Vidhate (ACP Hadapsar एसीपी हडपसर ते एसीपी प्रशासन)

5. नारायण देवदास शिरगांवकर ACP Narayan Devdas Shiragavkar (एसीपी प्रशासन ते एसीपी विश्रामबाग विभाग- ACP Vishrambaug)

6. श्रीमती रूक्मिणी मनोहर गलंडे ACP . Rukmini Manohar Galande (सहाय्यक आयुक्त वाहतूक ते एसीपी कोथरूड विभाग-ACP Kothrud)

 

पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलिस आयुक्त यशवंत गवारी (ACP Yashwant ACP Yashwant Namdev Gawri Gawri) यांची लष्कर विभागाच्या (Lashkar Divsion ACP) सहाय्यक पोलिस आयुक्त पदी (ACP Lashkar) नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title :- Pune ACP Transfers | Internal transfers of 6 Assistant Commissioners of Police in Pune! Appointments in Administration, Transport Branch, Crime Branch, Kothrud, Vishrambag, Hadapsar and Lashkar division

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jayant Patil on Pune Water Cut | पुण्यातील पाणी कपातीबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)

PF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे काढाल पैसे? जाणून घ्या सोपा मार्ग