Pune : नियमांचे उल्लंघन करणार्‍या सातारा रस्त्यावरील 5 हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या साथीमध्ये मिशन बिगेन अंतर्गत हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी शासन व महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहकारनगर – धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने सातारा रस्त्यावरील पाच हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई केली आहे.

क्षेत्रिय अधिकारी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा रस्त्यावरील हॉटेल्सची तपासणी केली. यावेळी मास्कचा वापर, दोन टेबल्समधील अंतर, अस्वच्छता यासंदर्भातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा रस्त्यावरील हॉटेल सौरभ, बासुरी, जगात भारी कोल्हापुरी, हॉटेल अभि किचन, हॉटेल नवरत्न या पाच हॉटेल व्यावसायीकांना प्रत्येकी अडीच हजार रुपये दंड करण्यात आला आहे.