पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त जळगाव मधून लोकसभेच्या रिंगणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील जळगावमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपने त्यांना तेथून उमेदवारी दिल्यास आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांनीही यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे सुत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपसह सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडून लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भर आहे. यापुर्वी पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी निवडणूक लढवून आपली राजकिय कारकिर्द घडविण्यासाठी इच्छुक आहेत.

साहेबराव पाटील यांनी मागील ३० वर्षांपासून पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते सध्या पुण्यात अप्पर पोलीस आयुक्त पदावर आहेत. त्यांच्या सेवेचा कार्यकालही लवकरच पुर्ण होणार आहे. ते जळगावमधून भाजपच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपने उमेदवारी दिल्यास ते पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. अशी माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे.

भाजपने देशभरात सर्वे केला असून विद्यमान खासदारांच्या कामाचा आढावा त्यातून घेण्यात आला आहे. राज्यात ४५ खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट युतीने ठेवलं आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यात उमेदवार निश्चितीसाठी जनभावनांचा विचार करतच आपली ताकद वाढविण्यावर भर आहे. त्यासाठी भाजपने राज्यात नवीन चेहऱ्यांनाही उमेदवारी देण्यावर भर दिला आहे. भाजपने अद्यापही उमेदवारांची घोषणा केलेली नसल्याने साहेबराव पाटील यांना जळगाव मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

ह्याही बातम्या वाचा –

#Loksabha : तुल्यबळ उमेदवाराच्या शोधासाठी रोहित पवार नगरमध्ये दाखल 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us