पुण्यात बसच्या धडकेत मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्कुटीवरुन जात असताना बसने दिलेल्या धडकेत मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुहास रामराव चव्हाण (वय ४९, रा. टिळकनगर, चेंबूर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात फुरसुंगी मंतरवाडी येथील किर्लाेस्कर कंपनीजवळ रविवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला.

हेही वाचा – संतापजनक ! पत्नी अंघोळ करताना अश्लिल फोटो व व्हिडिओ काढल्याने पतीने घेतले विषारी औषध 

सुहास चव्हाण हे मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होते. त्यांचे भाऊ हडपसर येथे राहतात. चव्हाण हे भावाकडे जात होते. चव्हाण हे कात्रजवरुन मंतरवाडीच्या दिशेने स्कुटीवरुन जात असताना समोरुन आलेल्या खासगी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.

हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध 

अपघातानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून हडपसर पोलिसांनी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच. टी. कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक खोपडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.