Pune : महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण करून विनयभंग, कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कात्रज भागात दोन मुलांचा अपघात झाल्याचा राग मनात ठेऊन एका दाम्पत्याला बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तर महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर मारहाण करून त्यांचा विनयभंग देखील केला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आसिफ अब्दुल रेहमान शिकीलकर व आमीन अब्दुल शिकीलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपींची ओळख असून, ते एकाच परिसत राहतात देखील. यातील फिर्यादी यांचा मुलगा व फिर्यादी यांच्या मुलाचा अपघात झाला होता. या रागातून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे पती हे आरोपीच्या घरी गेले व जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना व त्यांच्या पतीला बेदम मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.