Pune : घरफोड्यांनंतर आता सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांत घबराट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्यांनंतर आता सोनसाखळी चोरीच्या घटना हाेऊ लागल्या असून, एका दुचाकीस्वार महिलेचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी ३१ वर्षीय महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनसाखळी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी फिर्यादी व त्यांची मुलगी दुचाकीवरून त्यांच्या आईकडे जात होत्या. त्यावेळी सुतारदरा परिसरातील सुदाम निम्हण चौक येथे मोटारसायलवरून आलेल्या चोरट्याने गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण, आरोपी तोपर्यंत पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत.