पुणे संरक्षक भिंत दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोंढव्यात संरक्षक भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. तर, आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळून सहा मजूर ठार झाले. पावसाळ्यात शहरातील संरक्षण भिंत पडण्याच्या घटना घडू नयेत त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनालाही आता खडबडून जाग आली आहे.

सीमा भिंतीलगत, झाडाखालील कामगारांच्या वसाहती सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शहरातील बांधकामे, संरक्षण भिंत, रिटेनिंग भिंत, इमारत बांधकामे याबाबत काही धोकादायक स्थिती आहे का? याचा बीट निरीक्षकांमार्फत १० दिवसात या सर्व बाबींचा सर्वे केला जाणार आहे. धोकादायक बांधकाम आढळल्यास तातडीने विकसक, सोसायटी धारकांना पाडण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यांनी न पाडल्यास धोकादायक बांधकामावर कारवाई केली जाईल.

विकासक गृह प्रकल्पाचे डिझाईन नामांकित आर्किटेक्‍टकडून करुन घेतात. परंतु, गृह प्रकल्पातील संरक्षक भिंत, रिटेनिंग भिंत, सुरक्षारक्षकांची केबीन, कार्यालय, पाण्याची टाकी, क्‍लब हाऊस यांचे काम स्थानिक ठेकेदाराकडून केले जाते. यापुढे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना इमारतीचे स्ट्रॅक्‍चरल स्टॅबिलीटी सर्टीफिकेट घेणे बंधनकारक केले आहे. बांधकाम डिझाईननुसार केल्याचे हमीपत्र घेतल्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जाणार नाही.

 

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

जाणून घ्या मायग्रेनचा त्रास दूर करणारे ५ महत्त्वाचे उपाय

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव