पुणे : खून करुन मृतदेह फेकला कॅनॉलमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसर येथील कवडे मळा येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून करुन मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात फेकून दिला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री दीड वाजणेचे पूर्वी घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही.

कॅनॉलच्या पाण्यात वाहून आलेल्या मृत तरुणाचे अंदाजे ३० ते ३५ वय आहे. या तरुणाचा खून करुन पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला. मृत व्यक्तीचे दोन्ही पाय सुती कापडाने बांधले असून ओळख पटूनये यासाठी पाण्यात फेकण्यात आला असावा असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bebe0211-9e47-11e8-b70b-a918bbba3879′]

मृत तरुणाचा खून इतर ठिकाणी करुन मृतदेह कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. काल हा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एच.टी. कुंभार करीत आहेत.