पुणे : आंदोलन कर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस शिपायाला तीन जणांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतरांवर गुन्हा दाखल केली आहे. या घटनेत पोलीस शिपाई जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.३०) दुपारी पावणे दोनच्या सुमारास हांडेवाडी रोडवरील हॉटेल समृद्धी समोर घडली.

सतिश ज्ञानोबा कामठे (वय-३२ रा. देवाची उरुळी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर इतर दुचाकीवरील इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संदिप जमदाडे यांनी मुढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c799320d-94b4-11e8-83be-e924a3ef7ee5′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (सोमवार) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बंद पाळण्यात आला. बंदच्या बंदोबस्तासाठी संदिप जमदाडे हे हांडेवाडी रोडवरील हॉटेल समृद्धी समोर बंदोबस्तासाठी हजर होते. जमदाडे हे कर्तव्य बजावत असताना आरोपी सतिश कामठे याच्या दुचाकीवरुन काही इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी जमदाडे यांच्या अंगावर धाऊन जात त्यांना धक्का-बुक्की करुन त्यांच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून इतर फरार झाले. पोलिसांनी आरोपींवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.पी. शेंडगे करीत आहेत.