Pune : शेतीचा वाद ! शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्‍हाडीने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे भावकीत शेतीच्या वादातून १३ जणांच्या टोळक्याने आपल्याच नातेवाईकांवर हल्ला(attacked) करुन त्यात तरुणाचा कुर्‍हाडीने वार करुन खुन केला. तर इतर पाच जणांवर हल्ला(attacked) करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

शिरुर पोलिसांनी १३ जणांवर खुन, खुनाचा प्रयत्न, दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग बारकु माळवदे, बाबुराव दत्तु माळवदे, फक्कड दत्तु माळवदे, अभिजीत फक्कड माळवदे, लहु बाबुराव माळवदे, अंकुश बाबुराव माळवदे, शोभा फक्कड माळवदे, सुदाम लक्ष्मण माळवदे, ताईबाई लक्ष्मण माळवदे, पाटील लक्ष्मण माळवदे, वर्षा पाटील माळवदे, हिराबाई बारकु माळवदे, बारकु दत्तु माळवदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

रविंद्र तुकाराम माळवदे (वय २०) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तुकाराम खंडु माळवदे (वय ५०, रा. माळवदे वस्ती, कवठे येमाई, शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या शेतात सोमवारी दुपारी दीड वाजता घडली.

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

माळवदे यांच्या भावकीत शेतीचा वाद आहे. या वादाचा राग मनात धरुन आरोपी हे हातात कुर्‍हाडी व इतर हत्यारे घेऊन तुकाराम माळवदे यांच्या शेतात आले. त्यांनी हातातील कुर्‍हाड फिर्यादी यांच्या मानेवर मारत असताना त्यांचे मेव्हण्याने हात मध्ये घालून अडविल्याने त्यात ते जखमी झाले. त्यावेळी आरोपींनी रवींद्र माळवदे याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून त्याला ठार मारले. फिर्यादी यांची सून, भावजय बबुबाई यांना लाकडी दांडक्याने मारुन जखमी केली. मथु खंडु माळवदे यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने मारुन जखमी केले. तसेच पुतण्या आकाश, बहिण शोभा हिस कुर्‍हाडीने व लाकडी दांडक्याने मारुन जखमी केले.

 

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

लसीकरणाच्या मुद्द्यावरुन SC ने मोदी सरकारला पुन्हा फटकारले, म्हणाले – ‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’

नव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर