Pune-Ahmednagar Highway Accident | कारला धडकून लक्झरी बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; कारचालक ठार, 25 प्रवासी जखमी ( Video )

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Ahmednagar Highway Accident | पुणे – अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात (Pune-Ahmednagar Highway Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. शिरुर येथील बजरंगवाडी येथे कारची (Car) धडक बसल्यानंतर लक्झरी बस (Luxury Bus) चालकाचं नियंत्रण सुटलं. ती एका बाजूला उलटली आणि घासत घासत एका हॉटेलच्या पार्किंग पर्यंत गेली. त्यामुळे पार्किंगमधील काही कारचं नुकसान झाले. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू (Died) झाला असून 25 प्रवासी जखमी (Injured) झाले. हा अपघात काल (रविवारी) रात्री 11.15 वाजताच्या सुमारास घडला.

 

याबाबत माहिती अशी की, पुणे – अहमदनगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एका कार चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार दुभाजकावर धडकली. अपघात इतका भीषण होता की, कार पुढे जाऊन अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या लक्झरी बसला धडकली. धडक जोरात बसल्याने बस उजव्या बाजूला कलटी मारली. त्यानंतर ती रस्त्याला घासत एका रस्त्याच्या शेजारी असलेल्या रॉयल पॅलेसच्या दरवाज्यापर्यंत पोहोचली. (Pune-Ahmednagar Highway Accident)

 

 

दरम्यान, हॉटेल समोरच्या पार्किंगमध्ये अनेक कार उभ्या होत्या तेथे जाऊन बस धडकली.
त्यामुळे काही गाड्यांचे नुकसान झालं आहे. या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर 25 प्रवासी जखमी (25 Passengers injured) झाले आहेत.

 

Web Title :- Pune-Ahmednagar Highway Accident | luxury bus overturned after hitting the car 25 passengers injured

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा