Pune : भुईभार यांना एअर फोर्सच्या वतीने पदक आणि प्रशस्तीपत्र जाहीर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लोहगाव भागातील निवृत्त वैजिनाथ भुईभार यांना एअर फोर्सच्या वतीने पदक आणि प्रशस्तीपत्र जाहीर केले आहे. निवृत्तनंतर सैनिकांची अनेक कामे करत असल्याने त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले असून, पदकासाठी निवड झालेले वैजिनाथ हे एकमेव आहेत.

वायु सेनेत रामलिंग वैजिनाथ भुईभार यांनी ऑनररी फ्लाइंग ऑफीसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी वायुव सेनेत ३८ वर्षे नौकरी केली आहे. या कालावधीत नौकरी बरोबर सामाजिक कार्याला सुध्दा वेळ देत असत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुर्ण वेळ दिला. त्यांनी सेवानिवृत्त नंतर कुटुंब पेशन्स, सैनिकाच्या निधनानंतर त्यांच्या विधवांना पेशन्स, मुलींचे लग्न, परदेशात शिक्षणाची संधी, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक समस्याचे निवारण करणे, त्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेणे, उपचार बाबत मार्गदर्शन करणे असे काम केले आहे.

यासोबतच त्यांचे पुण्यातील लोहगावचे पॉली क्लिनिक स्थापनेत मोठे योगदान होते. यामुळे त्यांना त्याचे फाऊडर मेंबर करण्यात आले आहे. भुईभार यांच्या या कामाची दखल घेऊन वायुवसेनेचे चिफ ऑफ दी एअर स्टाफ एअर चिफ मार्शल भदेरीया यांनी त्यांना पदक व प्रशस्तिपत्र जाहीर केले. विशेष म्हणजे भारतातुन फक्त तीन जणांचा सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून निवड झालेले एकमेव व्यक्ती आहेत. वैजिनाथ बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) चे भुमीपुत्र आहेत. त्यांना पदक व प्रशस्तीपत्र जाहीर झाल्यानंतर सर्वस्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.