पुणे : सवलतीच्या दरात विमान तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बनावट ट्रॅव्हल कंपनी सरु करुन सवलतीच्या दरात विमानाची ऑनलाईन तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी तांत्रीक बाबींच्या आधारे दोघांना राजस्थान येथून अटक केली.

कमल उर्फ पार्थवी चंदेल (वय-३० रा. मानसरोवर, जयपुर), अमित सिंह (वय-३२ रा. फातीमानगर, पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
[amazon_link asins=’B01LQQHI8I,B00GASLJK6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52dc849f-b288-11e8-8171-8bffd2798d78′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी टूकॉन ट्रॅव्हल्स नावाची कंपनी स्थापन केली. कंपनी स्थापन करताना बनावट पत्ता टाकून कंपनीची माहिती जस्ट डायल व सुलेखा या वेबसाईटवर टाकली. ट्रॅव्हल कंपनीकडून सवलतीच्या दरात विमान कंपनीची तिकीट ऑनलाईन बुकींग बाबत माहिती देण्यात आली होती. ग्रहकांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी मार्केटयार्ड येथील साऊथ इंडिनय बँकेत बनावट पत्ता आणि इतर माहिती देऊन खाते उघडले होते.

मुंबई येथील सुषमा शर्मा यांनी आरोपींशी संपर्क साधून त्यांना सॅनफ्रान्सीको येथे जाण्यासाठी एअर इंडियाची दोन तिकीटे पाहिजे असल्याचे सांगितले. आरोपींनी व्हॉटसअॅपवरुन विमानाच्या तिकीटांचे बुकीग झाल्याचे भासवून त्यांना साऊथ इंडीन बँक, मार्केटयार्ड येथे ऑनलाईन ३ लाख ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर अर्ध्यातासात कनफर्म तिकीट पाठवले जाईल असे सांगण्यात आले. सुषमा शर्मा यांनी पैसे जमा करुन देखील त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे शर्मा यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. गुन्हा मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्याहद्दीत घडल्यामुळे सीबीडी पोलिसांनी हा गुन्हा मार्केटयार्ड पोलिसांकडे वर्ग केला होता.
[amazon_link asins=’B00N78RZO6,B00GASLORE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b009029-b288-11e8-b4c1-b3f744d93f33′]

मार्केटयार्ड पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स एजन्सीकडे जाऊन टूकॉन ट्रॅव्हल्स कंपनी बाबत चौकशी केली. चौकशी दरम्यान अशी कोणतीही ट्रॅव्हल्स कंपनी नसल्याचे समोर आले. तसेच ही कंपनी बनावट असून त्याद्वारे अनेकांची फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मार्केटयार्ड पोलिसांनी तांत्रीक तपास केला असता हे आरोपी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, जयपुर या शहरात कार्यरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन जयपुर राजस्थान येथून दोघांना अटक केली.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगांवकर, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकावड, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय सातव, तांत्रीक तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. गवळी, पोलीस हवालदार संदीप जाधव, मंगेश साळुंके, पोलीस शिपाई नितीन जाधव, संदिप घुले, अनिस शेख, रुपाली चांदगुडे, निशांत कोंडे, तसेच फरासखाना आणि सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने केली.

हेही वाचा
डाव्या पक्षांच्यावतीने १० तारखेला देशभर हरताळ 
पोलिसांना अतिप्रदान झालेल्या रक्‍कमेची वसुली करता येणार नाही
चंद्रकांत पाटलांचा ‘यू टूर्न’ 
सायबर दरोड्यानंतर तीन आठवड्यांनी कॉसमॉस बँकेची ई-बँकिंग सेवा सुरू 
तेलंगणानंतर आंध्र प्रदेशातही मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त ?