पुणे विमानतळाचा पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एअरपोर्ट कौन्सिल ऑफ इंटरनॅशनलच्या (एसीआय) कॅनडा येथील परिषदेत जगभरातील प्रवासी सेवेत सर्वोत्तम असलेल्या विमानतळांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ५० लाख ते दीड कोटी प्रवासी संख्या असलेल्या विमानतळांच्या गटात पुणे विमानतळाला जगभरातील तिसरे स्थान मिळाले आहे. तसेच कोलकाता विमानतळालाही तिसरे स्थान मिळाले आहे. कॅनडा येथे हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. त्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सदस्य आय. एन. मूर्ती यांनी भारताला मिळालेल्या पारितोषिकांचा स्वीकार केला.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20bd23fe-b7da-11e8-9d0e-9fa95c2ee426′]

एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी (एएसक्यू) अ‍ॅवॉड्र्स २०१८ अंतर्गत कोट्यवधी प्रवाशांनी नोंदविलेल्या मतांनुसार एसीआयने हे रेटिंग जाहीर केले. टर्मिनलपासून विमानतळाला जाण्याचा मार्ग, सुरक्षा विषयक तपासणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विश्रांतीगृह, स्टोअर्स, रेस्टॉरंट आदी प्रवासी सुविधेच्या विविध ३४ कॅटेगरीनुसार या विमानतळांवर सर्वेक्षण कले जाते.

एसीआयच्या व्यापारी संस्थेशी १७६ देशातील १९५३ विमानतळ सभासद आहेत. यंदा एसीआयच्या सर्वेक्षणामध्ये एशिया-पॅसिफिक गटातून भारतातील पुणे, लखनौ, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि इंदूर या सहा विमानतळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी (२०१७) झालेल्या सर्वेक्षणामध्ये ५० लाख ते दीड कोटी प्रवासी क्षमतेच्या विमानतळ गटामध्ये हैदराबाद दुसऱ्या स्थानी होते. तर, कोची, कोलकाता आणि पुणे विमानतळ संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर होते. यंदाही पुण्याने तिसरे स्थान कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी आशिया खंडामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वांत सुधारलेले विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाला गौरविण्यात आले होते. यंदा अहमदाबाद विमानतळाने २० लाख ते ५० लाख प्रवासी गटात अहमदाबादने क्रमांक पटकाविला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2779feb2-b7da-11e8-8f23-0f025a49b6bf’]

देशातील सर्वात व्यग्र मार्गांमध्ये पुणे-दिल्ली हवाई मार्ग सहावे स्थान, सर्वाधिक विमान उड्डाणांमध्ये नववे स्थान, २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवासी सुविधांमध्ये तिसरे स्थान असे बहुमान पुणे विमानतळाला मिळाले आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.