Pune Airport | पुणे विमानतळ 1 डिसेंबर पासून 24 X 7 सुरु राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  येत्या 1 डिसेंबर पासून पुणे शहरातील लोहगाव विमानतळावर (Pune Airport) 24 तास विमानाची सेवा (Airline service) सुरु होणार आहे. पुणे विमानतळावरुन (Pune Airport) फक्त 12 तासच विमानांची वाहतूक सुरु आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी केवळ सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विमानांची उड्डाणे होत होती. मात्र, आता 1 डिसेंबर पासून विमानांची उड्डाणे 24 तास होणार आहेत.

 

हवाई दलाकडून (Air Force) मागील वर्षापासून धावपट्टीचे काम करण्यात येत आहे.
या कामामुळे विमानतळ काही काळ बंद ठेवण्यात आले होते तसेच विमानाच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला होता.
सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेतच केवळ उड्डाणे होत होती.
1 डिसेंबर पासून 24 तास विमानांची उड्डाणे होणार असल्याच्या वृत्ताला विमानतळ संचालक संतोष ढाके (Airport Director Santosh Dhake) यांनी दुजोरा दिला आहे.

 

प्रवाशांची संख्या वाढणार

 

लोहगाव विमानतळावरुन (Lohegaon Airport) सद्यस्थितीला लोहगाव विमानतळावर 60 विमाने दिवसाला ये-जा करतात. यातून 17 हजार प्रवासी प्रवास करत असतात.
24 तास विमानांचे संचलन सुरु झाल्यास 90 पेक्षा अधिक विमानांचे उड्डाण होऊ शकेल. तसेच प्रवाशांची संख्या देखील वाढणार आहे.
सध्या रात्री 8 च्या आगोदर विमानप्रवास करावा लागत होता. मात्र, आता 24 तास उड्डाणे सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

CISF चे जवान वाढवणार

 

पुणे विमानतळाचे (Pune Airport) संचालक संतोष ढाके यांनी सांगितले, पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
दर दिवशी 17 ते 18 हजार प्रवासी येथून प्रवास करतात. त्यांची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे.
एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडू नये साठी सीआयएसएफचे (CISF) अतिरिक्त 500 जवान तैनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

2.5 एकर जागा भाड्याने घेणार

 

विमानतळ प्रशासन फक्त मालवाहतूकीसाठीच भारतीय वायुदलाच्या ताब्यात असलेली 2.5 एकर जागा भाड्याने घेणार आहे.
या बाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातून इतर राज्यात विमानाने होणारी मालवाहतुकीची सेवा पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि वेगाने होणार आहे.

 

Web Title : Pune Airport | Pune Airport will be open 24 X 7 from 1st December

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railway | देशात पहिल्यांदा मातीच्या डोंगराखाली रेल्वे बनवत आहे सर्वात मोठा बोगदा, जाणून घ्या कुठे?

NCP MLA Babajani Durrani | आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान; उधाण, प्रचंड खळबळ

Katrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं खाजगी लग्न