Pune Airport | …म्हणून पुण्यातील लोहगाव विमानतळ ‘या’ तारखेपासून 15 दिवस बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमानतळावरील (Pune Airport) धावपट्टीच्या कामासाठी पुणे येथील लोहगाव विमानतळावरील (Pune Airport) प्रवासी उड्डाणे 16 ऑक्टोबरपासून तब्बल 15 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून (Depending on Mumbai Airport) रहावे लागणार आहे. याचा आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे.

 

 

हवाई दलाकडून (Air Force) सप्टेंबर 2020 मध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या (Lohgaon Airport Runway) देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा महत्त्वाचा टप्पा 26 ऑक्टोबरपासून सुरु झाला होता आणि तेव्हापासूनच लोहगाव वरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जवळपास एक वर्षानंतर लोहगाव वरुन केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता ती देखील बंद होणार आहेत. हवाई दलाच्या निर्णयानुसार 16 ऑक्टोबरला सकाळपासून 30 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे, असे विमानतळ प्रशासनाने (airport administration) स्पष्ट केले आहे.

 

 

विमानतळ (Pune Airport) बंद करण्याची घोषणा केवळ दहा दिवस आधी करण्यात आली आहे.
त्यामुळे आतापर्यंत 16 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत तिकीट आरक्षित (Tickets reserved) केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
लॉकडाऊन (Lockdown) काळात रात्राची उड्डाणे बंद केली, तेव्हा हजारो प्रवाशांना तिकिट रद्द करावे लागले होते.
त्यावेळी तिकिटाचे पैसे परत मिळवताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली होती. हाच अनुभव पुन्हा प्रवाशांना येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

Web Title :- Pune Airport | pune lohegaon airports runway closure from october 16 to october 30 for re carpeting know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Palghar ZP By-Election | पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा थेट शिवसेनेला पाठिंबा; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today | सोन्यात 269 रुपये तर चांदीत 630 रुपयांची मोठी वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर

Vengurla Municipal Council | महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात धक्का ! काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मदतीने विजयी