ADV

Pune Airport Runway | OLS सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी ! पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्ताराच्या कामास वेग

नवी दिल्ली/पुणे : Pune Airport Runway | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतिक्षित OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे पुण्यातून मोठ्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केलेल्या पाठपुराव्याला पहिल्याच प्रयत्नात यश आले आहे.

पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने एएआय ओएलएस सर्वेक्षण करणार असल्याचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणामुळे धावपट्टीचा विस्तार करणे शक्य होईल व मोठ्या आकाराच्या विमानांना पुण्यातून उड्डाण करता येईल.

मोहोळ यांनी संरक्षणमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले होते, तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेटही घेतली होती. मुख्य सचिवांचीही या प्रकरणी भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओएलएस सर्वेक्षण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय झाला.

पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यग्र विमानतळांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे व सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले.

युरोपिय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. मोठ्या आंतराराष्ट्रीय विमानांवर छोट्या धावपट्टीमुळे इथून उड्डाण घेण्यास मर्यादा येत आहेत. या महाकाय विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) हालचाल सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज होती. मात्र, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याने पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होईल व मोठ्या आकाराची विमानेही इथून उड्डाण घेऊ शकतील.

मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातून चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, तिघांना अटक

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना