सोने तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे विमानतळावर अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी स्पाइसजेट फ्लाइट नं.एसजी ५२ च्या मधून आलेल्या मुंबईतील एका महिलेला अटक केली आहे. या महिलेकडून अधिकाऱ्यांनी ५१४.४८ ग्रॅम वजनाचे सोने तसेच गुडंग गरम सिगारेटचे दोन बॉक्स जप्त केले आहेत. पोलिसांनी या महिलेकडून १६ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई आज (रविवार) पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0b0056c-c4cc-11e8-b483-3d3c10bf9c45′]

सोने तस्कर करणारी महिला आज पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी मुंबई येथील वर्षा नावाच्या महिलेला ताब्यात घेतले. तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे पांढऱ्या रंगाने झाकलेली एक सोन्याची साखळी, जीन्स पॅन्टमध्ये लपवलेली तीन सोन्याची बटणे असा १६ लाख ३८ हजार ५१८ रुपयांचा ऐवज सापडला. तसेच १० हजार रुपये किमतीचे गुडंग गरम सिगारेटचे दोन बॉक्स मिळाले.

[amazon_link asins=’B0771P78KT,B0758BV26C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0296153e-c4cd-11e8-a67b-3587f9aac841′]

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण १६ लाख ४८ हजार ५१८ रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. याबाबत महिलेकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिच्यावर कस्टम्स अॅक्ट १९६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काेल्हापूरच्या गाेकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत चपलांचा पाऊस

जाहिरात.