पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच, कोंढव्यात फ्लॅट फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलांना भेटण्यासाठी गावी गेलेल्या तरुणाचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 9 ते 15 डिसेंबर या कालावधीत कोंढवा खुर्दमधील ईशापर्ल सोसायटीत घडली. याप्रकरणी अमित ओसवाल (वय 36, रा. कोंढवा-खुर्द ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमित एका खासगी कंपनीत कामाला असून पत्नी व मुलांसह कोंढव्यातील ईशापर्ल सोसायटी राहायला आहेत. 8 डिसेंबरला ते पत्नी आणि मुलांसह वडिलांना भेटण्यासाठी गावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी 9 ते 15 डिसेंबर कालावधीत त्यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील 30 हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. मधाळे अधिक तपास करीत आहे.

लॉटरी लागल्याचे सांगत सतरा लाख उकळले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –
नापतोल कंपनीतर्फे तुम्हाला साडे बारा लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना सायबर भामट्यांनी तब्बल साडे सतरा लाख रुपायांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ऑगस्ट 2017 ते मे 2019 दरम्यान शुक्रवार पेठेत घडली.

याप्रकरणी दत्तात्रय ओतारी (वय 59, रा. शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय ओतारी शासकीय नोकरीतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. तत्पुर्वी त्यांची मुलगी नेहमी नापतोल ऑनलाईन शॉपींगच्या वेबसाईटवरुन घरपयोगी वस्तुंची खरेदी करीत होती. दोन वर्षांपुर्वी कामावर असताना ओतारी यांना नापतोल कंपनीतून बोलत असल्याचे सांगत साडेबारा लाखांची लॉटरी लागल्याचा फोन आला. सायबर चोरट्यांनी ओतारी यांच्याशी वेळोवेळी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया पुर्ण करण्याचे सांगितले.

बक्षिसाची रक्कम मिळण्याच्या अपेक्षेने ओतारी यांनी सायबर चोरट्यांच्या सांगण्यानुसार वेळोवेळी मिळून 17 लाख 54 हजार 750 रुपये ऑनलाइन जमा केले. रक्कम जमा करुनही बक्षिस न मिळाल्याने दत्तात्रय यांनी संबंधिताशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक आर.एस.राजमाने तपास करीत आहेत.


पादचाऱ्याला लुटले

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – पादचार्‍याला अडवून दुचाकीस्वार चोरट्यांनी मारहाण करीत 10 हजार 500 रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विमाननगरमध्ये घडली. याप्रकरणी नादीर निलबिरीवाला (वय 49, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नादीर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या ते विमाननगर चौकातून चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून 10 हजार 500 रोकड ठेवलेली बॅग पळवून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. पिंगळे अधिक तपास करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/