हडपसर परिसरात महिला पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान बंदोबस्तावर असणार्‍या महिला पोलीसाला धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. रोहित राजू जाधव (वय 22, रा. माळवाडी, हडपसर), गणेश अशोक अग्रवाल (वय 27, रा. हडपसर), अनिल अशोक अग्रवाल (वय 23 रा. गाडीतळ, हडपसर), अमोल उमेश घोडके (वय 23, रा. माळवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महानगरपालिका सहायक अतिक्रमण निरीक्षक विलास अभंगे (वय 26)  यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरतील मंत्री मार्केटमध्ये रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे दोन दिवसांपुर्वी अतिक्रमण विरोधी पथक त्याठिकाणी कारवाई करीत होते. त्यावेळी कारवाईस विरोध करण्यासाठी रोहित, गणेश, अनिल, अमोलने आरडाओरड करीत अभंगे यांना धक्काबुक्की केली. महिला कर्मचारी अश्विनी गायकवाड यांच्यासह इतर पोलिस कर्मचाछयांनाही धक्काबुक्की केली. महानगरपालिका अधिकाछयांनी जप्त केलेले साहित्य रस्त्यावर फेकले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. डी. पाटील अधिक तपास करीत आहेत.

शहरात घरफोड्या व सोन साखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, खडकी परिसरात एका ज्येष्ठ महिलेची सोन साखळी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी 62 हजार रुपयांचा ऐवज नेला आहे.
याप्रकरणी 59 वर्षीय जेष्ठ महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ महिला गृहिणी आहेत. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. बोपोडी येथील जयकर अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील 62 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून नेली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक शफिल पठाण करीत आहेत.

तीन अल्पवयीन दुचाकीस्वार
मुलांनी केली तरुणाला मारहाण

– हॉर्न वाजवू नका सांगितल्यावरून झाला वाद

पुणे पोलीसनामा ऑनलाईन

वाहतूक कोंडी अन त्यात बेशिस्तांचा सामना करत रस्ता काढताना पुणेकरांच्या नाकीनऊ येत आहे. दुसरीकडे वाहतूक पोलीसांचा कारवाईचा बडगा सुरू असताना तीन अल्पवयीन दुचाकीस्वार मुलांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बिबवेवाडीत घडली आहे.

याप्रकरणी गणेश साळुंखे (वय 28, रा. आंबेगाव कात्रज ) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघा विधीसंघर्षीत बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश हा दोन दिवसांपुर्वी लोअर इंदीरानगर येथील अंकुश मित्र मंडळासमोर कडेला उभारला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघे अल्पवयीन मुल जोरजोरात हॉर्न वाजवित गाडी हळू चालवित होते. त्यामुळे गणेशने त्यांना थांबवून हॉर्न न वाजविण्याचा सल्ला दिला. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी मिळून गणेशला शिवीगाळ करीत सिमेंटचा पेव्हिंग ब्लॉक फेकून मारला. पोलीसांनी त्या तिघांना पकडले. त्यांना ताब्यात घेऊन समज दिली. तसेच, पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात दिले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/