बेपत्ता मुलीबाबत चौकशी करण्यासाठी आलेल्या युवकाचा पोलिस चौकीतच ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेपत्ता असणार्‍या मुलीबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस चौकीत आणण्यात आलेल्या तरुणाने चौकीतच राडा घालून पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. खिडकीच्या काचा फोडताना तो जखमी झाला आहे. फरासखाना परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी निखील भोसले (रा. मंगळवार पेठ) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी पोलीस शिपाई किरण धाईंजे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या चौकशीसाठी निखील भोसले याला गुरूवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास फरासखाना पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गाडीतळ पोलिस चौकीत आणण्यात आले होते. त्यावेळी निखीलने चौकीतील काचेच्या खिडकीवर डोके आपटून खिडकीची काच फोडून तो स्वत: जखमी झाला. त्याने सार्वनिक मालमत्तेचे नुकसान करून मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा व शिवीगाळ करून फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने निखीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोनसाखळीच्या बदल्यात पिवळ्या रंगाचा तुकडा देऊन महिलेची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोनसाखळीच्या बदल्यात सोन्याचा तुकडा असल्याचे भासवून पिवळसर तुकडा देऊन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 64 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारस या हडपसर येथील भाजी मंडई परिसरातून फोटो फ्रेम बसवून पायी गाडीतळ येथे जात असताना अष्टेकर ज्वेलर्सच्या दुकानाजवळ त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटली. त्याने महिलेला 15 तोळे वजनाची सोन्याची लगड देतो सांगून त्याबदल्यात तुम्ही मला तुमची सोन्याची माळ व पैसे द्या अशी बतावणी करून महिलेला एक पिवळसर रंगाचा तुकडा दाखविला. तो पिवळसर रंगाचा तुकडा महिलेला देवून त्यांच्याकडील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ व सहाशे रूपये घेऊन महिलेची फसवणूक केली.


सरकारी कामात अडथळा, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षा चालकासोबत हुज्जत घालणार्‍या तरूणांना समाजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना मारण्यासाठी अंगावर धावून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार गुरूवारी मगरपट्टा ब्रिजखाली घडला.

अविनाश राजेश पवार (28, रा. न्यु मोदी खाना, कॅम्प), सुरज सुखबीर वाल्मीकी (28, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) आणि एल्वीन जॉन मोन्टेरीओ (29, रा. न्यु मोदीखाना, कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

गुरूवारी फिर्यादी दुधभाते हे हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना हडपसर येथील मगरपट्टा ब्रिजखाली चौकात आले असताना, यातील संशयीत आरोपी रिक्षा चालकाबरोबर हुज्जत घालत असताना दिसले. हा प्रकार पाहिल्यानंतर दुधभाते हे त्यांना समजावून सांगत असताना तिघांनी संगनमत करून पोलिस शिपाई एच. पी. झगडे यांच्याशी हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून येऊन फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. गुन्ह्याचा पुढील तपास एस. एम. क्षीरसागर हे करित आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/