Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना(corona) व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर येत असली तरी देखील मृत्यू संख्येत मात्र दररोज भर पडत आहे. काही जिल्हयांमध्ये कोरोनाचा(corona) प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 15 जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यापार्श्वभुमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील नव्या निर्बंधांबाबतची माहिती दिली आहे. आता पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहणार आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबईत होणार्‍या गर्दीवर नाराज, म्हणाले…

शनिवारी आणि रविवारी केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र शहरातील व्यायामशाळा, जिम, उद्यानं, बागा आणि हॉटेल बंद राहणार आहेत. दरम्यान, हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहणार आहेत. सदरील आदेश हा आगामी दहा दिवसांसाठी असणार आहे. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचारी आणि अधिकार्‍यांसाठी सुरू राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सध्यातरी त्याव्दारे प्रवास करता येणार नाही अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे देखील सांगण्यात आले आहे.

कडक निर्बंधांबाबत शिथिलता देण्यासाठी काढण्यात आलेला आदेश खालील प्रमाणे.

1. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी मनपाकडील दि. 14 एप्रिल आणि दि. 28 मे रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस रोज सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

2. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील.

3. पुणे मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

4. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दि. 14 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार सुरू राहतील.

5. पुणे मनपा क्षेत्रातील ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा राहणार आहे.

6. पुणे मनपा क्षेत्रात दररोज दुपारी 3 नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल.

7. पुणे मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालय (अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणार्‍या कार्यालयां व्यतिरिक्त) 25 टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील.

8. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

9. पुणे मनपा क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

10. वरील आदेशा व्यतिरिक्त इतर बाबींसाठी मनपाच्या दि. 14 एप्रिल, 17 एप्रिल, दि. 20 एप्रिल, दि. 22 एप्रिल, 30 एप्रिल, 14 मे आणि 28 मे 2021 रोजी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

11. संदर्भीय आदेशान्वये वेळावेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

12. सदर आदेश दि. 1 जून 2021 पासून पुढील 10 दिवस पुणे मनपा कार्यक्षेत्रापर्यंत लागू राहतील. त्यानंतर कोविड पॉझिटिव्हीटी बाबतचा आढावा घेण्यात येईल. कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णसंख्येचे प्रमाण वाढल्यास त्याअनुषंगाने सुधारित आदेश निर्गमित करण्यात येतील.

Pune : ‘सीरम’कडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतोय ? व्यवहार टक्केवारीसाठी अडलायं की अंतर्गत कलहामुळे – माजी आमदार मोहन जोशी

पुण्यातील मद्यविक्रीची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.

Coronavirus in Pune : मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या

Chest Physiotherapy : श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार