Pune : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 1 जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका कायम असल्याने राज्यातील लॉकाडाऊन 15 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवत असताना शनिवार आणि रविवार बंद असणारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाचा नवीन आदेशाच्या आधीन राहून दुकाने दुपारी 2 पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यां (Merchant) नी केली आहे.

हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या

शासनाच्या नवीन नियमांना अधीन राहून व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे. आज (सोमवार) सकाळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व सह आयुक्त रुबल अग्रवाल यांची आयुक्तांच्या कार्यालयात पुणे शहरातील दुकाने उघडण्या संदर्भात भेट घेऊन ही मागणी केली. तसेच पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे अशी मागणी पुणे जिल्हा रीटेलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

शासनाच्या नवीन नियमावलीत नमूद केल्यानुसार पुणे मनपा हद्दीत कोरोना बाधितांची गेल्या आठवडाभरातील सरासरी प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी असून रुग्णालयामध्ये 76 टक्के ऑक्सिजनच्या खाटा रिकाम्या आहेत .त्यानुसार निर्देश शिथिल करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी ,अशी आग्रही मागणी पुणे व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली.

Health Tips : ब्रेन पावर वाढवते ‘ही’ एरोबिक एक्सरसाईज, जाणून घ्या इतर फायदे

‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत

यावर आयुक्तांनी मागील दोन महिन्याच्या काळात व्यापाऱ्यांनी चांगले सहकार्य केले असून यापुढेही व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, नवीन आदेश काढताना सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही दिली. सुधारित आदेश आज संध्याकाळ पर्यंत काढण्यात येईल त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. यावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया उपस्थित होते

Ajit Pawar on Corona Vaccination : ‘लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी’

Chest Physiotherapy : श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार