भाजी विक्रीतून पैलवानांचा सोसायटीत तुफान ‘राडा’, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सोसायटीत न विचारता टेम्पो घालून भाजी विक्री करणाऱ्यास हटकल्यावरून सात ते आठ पैलवानांनी तुफान राडा घालत हातात कोयते आणि लाठ्या-काठ्या घेऊन दूध डेअरीची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. आंबेगाव बुद्रुक भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी सुभाष शिंदे (वय 64) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पैलवान सचिन मोहोळ आणि त्याचे सात ते आठ साथीदार यांच्यावर आर्म ऍक्ट, जबर मारहाण या कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील लिपणे वस्तीत अमृतसीटी या बहुमजली सोसायटीत राहतात. ते भाजी विक्रेते आहेत. दरम्यान रविवारी एक लाल टेम्पो घेऊन विना परवाना त्यांच्या सोसायटीत भाजी विक्री करण्यासाठी आत शिरला. यावेळी फिर्यादी यांनी त्याला न विचारता सोसायटीत शिरल्याबाबत जाब चिरला. तसेच येथे भाजी विक्री करू नको असे सांगितले. याचा राग आल्याने तो येथून निघून गेला.

त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो पैलवान सचिन मोहोळ आणि त्याच्या इतर पैलवान साथीदाराना घेऊन आला. यावेळी त्यांच्या हातात कोयते आणि लाठ्या-काठ्या होत्या. त्यांनी येताच तुफान गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करत श्रीनाथ डेअरीत घुसून सौरभ शेवाळे आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. या गोंधलामुळे सोसायटीचे लोक जमा झाले. त्यावेळी त्यांनाही शिवीगाळ करत येथील प्रकाश मारणे यांना मारहाण केली. अचानक झालेल्या याप्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता. पैलवान बेदम मारहाण करून पळून गेले. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

You might also like