Pune Ambil Odha Slum | ‘… तर बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो’ ! आंबील ओढा कारवाई प्रकरणावर नितीन राऊतांचा तीव्र संताप

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune ambil odha slum | पुणे शहरातील (Pune City) आंबील ओढ्याच्या (Ambil Odha Slum) कारवाई प्रकरणामध्ये काँग्रेसचे (Congress) नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उडी घेतली आहे. पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) लाज वाटली
पाहिजे, माझ्या नागपूरात (Nagpur) अशी कारवाई (Action) झाली असती तर बुलडोझर (Bulldozer) पुढे आडवा पडलो असतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. पुण्यात (Pune) पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आंबील ओढा प्रकरणात (Ambil Odha Case) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर झालेल्या आरोपांवर बोलणं टाळलं.

pune ambil odha slum | nitin raut refrained from speaking on the allegations against ajit pawar on ambil odha case in pune

महापौर काय झोपा काढत होते का ?

पुणे शहरातील आंबील ओढा (Pune City Ambil Odha Case) परिसरातील अनधिकृत बांधकामावर (Unauthorized construction) पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) कारवाई केली. पुणे महापालिकेच्या या कारवाई प्रकरणी पत्रकारांशी बोलताना नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, कोरोनामुळे लॉकडाऊन (Corona Lockdown) लागू होता. शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे. अशा या बिकट परिस्थिती गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) लाज वाटली पाहिजे. महापौर (Mayor) काय झोपा काढत होते का ? असा सवाल विचारत नितीन राऊत यांनी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्यावर टीका केली.

तर मी बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो

ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) पुढे म्हणाले, पावसाळ्यात, महामारीच्या काळात कारवाई
केली. महिलांचे केस ओढले, या सर्व प्रकरणाची चौकशी (Inquiry) व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच माझ्या नागपूरात (Nagpur) जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो, असेही नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

अजित पवारांच्या आरोपांवर बोलणं टाळलं

पुणे शहरातील आंबील ओढा (Pune City Ambil Odha) परिसरातील अनधिकृत बांधकामावर
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) कारवाई केली. परंतु आंबील ओढा
(Ambil Odha) परिसरातील नागरिकांनी या कारवाईवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे
पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप (Allegation) केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आंबील ओढ्यात बिल्डर अजित ओव्हर (Builder Ajit Over) यांच्या जवळचा पालकमंत्र्यांनीच
तोडकाम कारवाई न थांबवण्याचे आदेश दिले असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर
करण्यात आला. यासंदर्भात नितीन राऊत (Nitin Raut) यांना विचारण्यात आले असता याला पुणे
महापालिकाच जबाबदार आहे, असे सांगत राऊत यांनी अजित पवारांच्या आरोपावर बोलणं टाळत
काढता पाय घेतला.

 
Ganesh Utsav – 2021 | ठाकरे सरकारकडून यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर, जाणून घ्या संपूर्ण नियमावली

OBC Reservation | आ. गोपीचंद पडळकरांच्या टीकेला थोरातांच्या कन्या शरयूने दिले प्रत्युत्तर, म्हणाल्या- पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की अस होत

Khadki Ammunition Factory News | खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीचा भाग असलेल्या बोट क्लब रोडवरून 7 चंदनाच्या झाडांची चोरी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune ambil odha slum | nitin raut refrained from speaking on the allegations against ajit pawar on ambil odha case in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update