Pune Ambil Odha Slum। आंबिल ओढा येथील स्थानिकांना न्यायालयाचा दिलासा; कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ambil Odha । दांडेकर पुलानजीक आंबिल ओढ्याच्या परिसरातील अतिक्रमण (Encroachment) असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, आंबिल ओढ्याच्या वसाहतीतील स्थानिकांना आता दिलासा मिळाला आहे. अतिक्रमणे हटविण्याच्या पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कारवाईला आता स्थगिती देण्यात आली आहे. हा आदेश पुणे महापालिकेच्या न्यायालयानं (Court) दिला आहे. न्यायालयाच्या (Court) आदेशानंतर महापालिकेनं तात्काळ कारवाई थांबवली आहे. जेसीबी मशीन परत जात आहेत. त्यामुळे स्थानिकांनी तुर्तास सुटकेचा श्वास सोडला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आंबील ओढ्याच्या परिसरात आज सकाळपासूनच अतिक्रमण हटवण्यात येत होतं. यामुळे अनेक नागरिक आक्रोश करू लागले होते. काही नागरिक आत्मदहनाचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलीस आणि स्थानिक वाद चिघळला होता. दरम्यान, आंबील ओढा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत. तर पावसाळ्यात परिसरात पाणी तुंबते. तसंच, मोठं नुकसान होतं, असं महापालिकेचं म्हणणं आहे. या कारणाने येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस महापालिकेनं काढली होती. परंतु, याला येथील नागरिकांनी विरोध केला.

महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कारवाईवरून स्थानिक नागरिक आरोप करीत होते. आंबील ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असून त्यात लोकप्रतिनिधींचाही हात आहे, असा आरोप करत नागरिकांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान, अशा परिस्थितीवरून हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात (Court) धाव घेतली होती. हनुमंत फडके यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी काही कागदपत्रेही न्यायालयात (Court) सादर केलीत. त्यावर तातडीची सुनावणी करण्यात आली. यावरून न्यायालयाने (Court) कारवाईला स्थगिती दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Pune Ambil Odha Slum  | pune pmc court stays action against structures at ambil odha

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी