Pune Amenity Space | भाजप पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी पाटलांचे ऍमेनिटी स्पेस विक्रीला समर्थन – राष्ट्रवादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune Amenity Space | महापालिकेच्या (PMC) मिळकतींची थकबाकी ज्यांच्याकडे आहे, मग ते कोणीही असोत त्यांच्याकडून ती प्रशासनाने निश्‍चित वसुल करावी ही आमची भुमिका आहे. परंतू सत्ताधार्‍यांनी कुठल्याही परिस्थितीत महापालिकेच्या ऍमेनिटी स्पेसची (Pune Amenity Space) विक्री करू नये, याला आमचा विरोधच राहील. मात्र, भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहेत. पाटील यांना आव्हान आहे, त्यांच्या मागील साडेचार वर्षातील सत्ताकाळात केलेला भ्रष्टाचारासंदर्भात आगेकुच केल्याचा खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रशांत जगताप म्हणाले, की १८५ पैकी ७४ ऍमेनिटी स्पेस या पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघामध्ये आहेत. याची विक्री करून त्याठिकाणी काय उभारणार आहात? हे जाहीर करावे.
केवळ महापालिकेकडे पैसे नाहीत म्हणून ऍमेनिटी स्पेस विक्रिचे (Pune Amenity Space) समर्थन करून ते पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
महापालिकेकडे २२०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
यापैकी एक हजार कोटी रुपये खर्चून पुणेकरांना अपेक्षित सोयी सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे.
परंतू त्याऐवजी केवळ विरोधकांवर आरोप करून सत्ताधारी दिशाभूल करत आहेत.

 

याउलट भाजपच्या सत्ताकाळात चोवीस तास पाणी पुरवठा, कात्रज कोंढवा रस्ता (Katraj-Kondhwa Road) अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार रोखण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेससह
(NCP) विरोधी पक्षांनी आवाज उठविला, हे पाटील लक्षात ठेवावे.
महापालिकेच्या मिळकतींच्या नोंदी ज्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आहेत, त्यांच्याकडील थकबाकी महापालिकेने (Pune Corporation) वसुल करावी, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भुमिका आहे.
त्यामध्ये कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ऍमेनिटी स्पेसची मर्यादा १५ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर
करण्यात आल्याबाबत बोलताना जगताप यांनी मुळात युनिफाईड डीसी रुल्स हे देवेंद्र फडणवीस
हे मुख्यमंत्री असतानाच अंतिम करण्यात आले आहेत.
ऍमेनिटी स्पेसची मर्यादा का कमी केली याचे उत्तर पाटील यांनी फडणवीस यांच्याकडूनच घेतले तर अधिक बरे होईल, असा टोलाही जगताप यांनी यावेळी लगावला.

 

Web Title : Pune Amenity Space | Patal’s support for sale of amenity space to cover up mistakes of BJP office bearers – NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कमाईची गोष्ट ! SBI चा धमाका, आता तुम्हीसुद्धा घरबसल्या कमवा 60 हजार रुपये महिना, जाणून घ्या अटी

Barti Pune | बार्टीला नियमित निधी न दिल्यास भाजप तर्फे आंदोलनाचा इशारा; भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? खुलासा करावा ! ओबीसी समाजाचा विश्वासघात करणार्‍या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन