Pune-Amravati Crime News | पुण्यातील 8 कैद्यांचा अमरावती कारागृहात राडा

अमरावती : Pune-Amravati Crime News | येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) हलविण्यात आलेल्या पुण्यातील ८ कैद्यांनी राडा घातला असून दोघा कैद्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली आहे. (Pune-Amravati Crime News)

याप्रकरणी कारागृहाचे सुभेदार एएसआय प्रल्हाद इंगळे यांनी फ्रेजरपूरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय घाडगे, अक्षय सोनसे, आकाश मिरे, आशिष डाकले, अर्जुन मस्के, प्रज्योत पांडुरंग, अभिषेक खोड व अमीर मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे या दोघांना अश्लील
शिवीगाळ करुन येरवडा कारागृहातून आलेल्या ८ कैद्यांनी मारहाण केली.
ते मारहाण करत असल्याचे दिसताच तेथील २ कर्मचार्‍यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला़. मात्र त्यांनी ऐकले नाही व मारहाण सुरुच ठेवली. तेव्हा या कर्मचार्‍यांनी शिटी वाजवून कारागृहातील इतर कर्मचारी व अधिकार्‍यांना बोलविण्यात आले. अन्य कर्मचारी आल्यानंतर त्यांनी बळाचा सौम्य वापर करुन हा वाद सोडविला.

Web Title :- Pune-Amravati Crime News | 8 Pune prisoners protest in Amravati Jail

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | मावस भावाकडून 15 वर्षाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; मावळमधील घटना

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Shah Rukh Khan | पठाणच्या रिलीजआधी शाहरुख खानने चाहत्यांना दिले ‘हे’ सरप्राइज