पुणे : बायकोला घरातून हाकलल्याच्या रागातून मद्यपी मुलाकडू आईला मारहाण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन

बायकोला घराबाहेर हाकलल्याच्या रागातून एका मद्यपी मुलाने आईला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेत आईचा हात दुखावला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. ही घटना लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोमवारी (दि.२३) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a23b7e1-8f61-11e8-963b-3b50a8a62279′]

सिंधू गोपीचंद दरेकर (वय ४५, रा. बालाजी हाईटस, कदमवाकवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा अभिजीत गोपीचंद दरेकर (वय २७) यांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सिंधू दरेकर या घरी असताना अभिजीत दारु पिऊन घरी आला. त्याने माझ्या बायकोला घरातून का हाकलून दिले, असे विचारत आईला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात आईचे करंगळी व त्या शेजारील बोट फ्रॅक्चर झाले. आर्ईने मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.