Pune : कॅम्प परिसरात विनामास्कची कारवाई करताना अधिकार्‍यास मारहाण, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   लष्कर परिसरात विनामास्क कारवाई करताना अधिकाऱ्यास दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्या दोघांना पोलिसांनी अटक केले. बबलू अन्वर सैय्यद (वय २५) व आयुब जावेद शेख (वय २०, दोघेही रा. लष्कर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उपनिरीक्षक गणेश कुलाळ हे पथकासह मोहम्मद स्ट्रीट परिसरात विनामास्क नागरिकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी पोलिसांनी तेथे आलेल्या बबलू आणि आयुबला विनाकारण पदपथावर उभे राहू नका असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी संगनमत करुन गणेश यांना मारहाण केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. शिळमकर तपास करीत आहेत.