Corornavirus : पुणे शहरात दिवसभरात 298 तर पिंपरीत 122 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी (दि.18) दिवसभरात 298 रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात बरे झालेल्या 276 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील 379 रुग्ण क्रिटिकल असून दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार 061 इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 379 रुग्णाची प्रकृती क्रिटिकल आहे. यातील 231 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 564 इतकी झाली आहे. आज 276 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 1 लाख 65 हजार 790 इतकी झाली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 1 लाख 75 हजार 415 एवढी झाली असून आज शहरातील विविध केंद्रावर 3658 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये 122 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

पिंपरी : औद्योगिकनगरीत दिवसभरात 122 जण पॉझिटिव्ह आढळले असून 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 पिंपरी महापालिका हद्दीतील आहेत तर 3 जण हद्दीबाहेरील आहेत. पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 95 हजार 070 एवढी झाली असून त्यापैकी 91 हजार 707 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये आजपर्यंत 2 हजार 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 हजार 733 रुग्ण शहरातील तर 713 रुग्ण हे शहराबाहेरील आहेत. सध्या शहरामध्ये 719 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. शहरामध्ये हद्दीबाहेरील 102 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरातील 114 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये मृत्यू झालेले रुग्ण चिखली, मोशी, काळेवाडी, रावेत, चिंचवड, रहाटणी, बारामती, तळेगाव दाभाडे, कोंढवा येथील रहिवासी आहेत.