PVR, INOX, Cinepolis यांसारख्या बड्या सिनेमागृहात ‘या’ खाद्यपदार्थावर बंदी ; प्रचंड अस्वच्छतेमुळे FDA चा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपण बाहेर सिनेमा वैगरे पाहयाला गेलो तर तेथील खाद्यपदार्थ खाणं पसंत करतो. परंतु त्याच्या स्वच्छचेबाबत कोणी विचार करत नाही. पुण्यातील अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांबाबत त्यांच्या अस्वच्छतेबाबात खुलासे झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने यावर कारवाईही केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध सिनेमागृहात समोस पुरवणाऱ्या मे. एम. के. एंटरप्राइजेस या उत्पादकाला समोसे तयार करण्यावर व विक्री करण्यावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली.

मे. एम. के यांच्या समोसे तयार होत असलेल्या कारखान्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या समोर आले. ज्या ठिकाणी हे समोसे तयार केले जात होते, तेथे अत्यंत अस्वच्छता असल्याचं दिसून आलं आहे. समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची तपासणी देखील आतापर्यंत करण्यात आली नव्हती. तसेच काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नव्हती. महत्त्वाची बाब म्हणजे समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तेल तीन ते चार वेळा वापरण्यात येत होते, अशी सर्व माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच याच आधारावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत मे. एम.के. एंटरप्राइजेस यांचा समोसा उत्पादक कारखान्यातील उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले.

विशेष म्हणजे आपण विश्वासही ठेवणार नाही अशा जागेंवर हे समोसे विकले जात होते. मोठ्या ठिकाणी आणि महागडे खाद्यपदार्थ खाण्यात आपण धन्यता मानतो. परंतू ते कसे, कुठे आणि कशा पद्धतीने बनवतात हे कोणी पाहत नाही. हे अस्वच्छतेत बनलेले समोसे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि विशाल ई-स्क्वेअर या नामांकित सिनेमागृहात विकले जात होते. आता अन्न आणि सुरक्षा प्रशासनाने ते विकण्यावर प्रशानाने बंदी आणली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

अवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा