पुणे आणि रावेर लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ‘एक्सचेंज’ होणार ?

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आघाडीच्या जागा वाटपामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी तर पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही असे चित्र आहे तर पुण्यात भाजपच्या गिरीष बापट यांच्या विरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यामुळेच या दोन जागा एकमेकांमध्ये ‘एक्सचेंज’ करण्याच्या हलचालीस वेग आला आहे. त्याबाबतची चर्चा दिल्लीमध्ये दोन्ही पक्षात चालू आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्ष्याकडून बोलण्यास नकार देण्यात येत आहे.

त्यामुळे लोकसभेसाठी दमदार उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुणे आणि रावेरच्या जागेची अदलाबदली करतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत जागा वाटपाच्या वाटाघाटीत रावेरची जागा कॉंग्रेसकडे तर पुण्याची जागा कॉंग्रेसकडे आहे. रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. तर पुण्यात गिरीष बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसकडून पुण्यात गिरीष बापटांच्यासमोर दमदार उमेदवाराची चाचपणी सुरु केली. मात्र त्यांना अद्याप उमेदवार निश्चित करता आला नाही. तर रावेरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. परंतु अद्याप राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे पुण्याची जागा ऱाष्ट्रवादीला देऊन कॉंग्रेस रावेर येथून आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, अशा प्रकारे जागांची अदलाबदली करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दोन्ही पक्षांकडून दुजोरा देण्यात आला नाही. आगामी काही तासांमध्ये रावेर आणि पुण्याचे चित्र सर्वांसमोर असणार आहे.