अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, पुण्यात उपचारासाठी दाखल (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांना सर्दी, खोकला आणि अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना हॉस्पिस्टमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे.

अण्णा हजारे यांना खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना राळेगण सिद्धि येथून शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे एक पथकाने त्यांच्या तपासणी केली असून त्यांच्यावर प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले असून अण्णा हजारे यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

अण्णा हजारे यांना सर्दी आणि खोकला झाला आहे. त्यामुळे त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. आता त्यांची प्रकृती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात त्यांना अशक्तपणा आल्याने अण्णा हजारे यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –