Pune Anti Corruption | 10 हजाराची लाच घेताना पुणे मनपातील 2 कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Anti Corruption | किटक विभागात बदली न करण्यासाठी बिगारी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून 10 हजाराची लाच स्विकारताना (Accepting Bribe) पुणे महानगरपालिकेतील (Pune Corporation) मुकादम आणि कचरा गाडीवरील (झाडुवाला) कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) शनिवारी (दि.02) सापळा (Anti Corruption Trap) रचून रंगेहाथ पकडले. एसीबीने (ACB) कचरा गाडीवरील कर्मचाऱ्याला अटक केली असून मुकादम फरार झाला आहे.

कचरा गाडीवरील कर्मचारी हर्षल ज्ञानेश्वर अडागळे Hershal Dnyaneshwar Adagale (वय-31) असे लाच घेताना अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मुकादम रवी लोंढे (Ravi Londhe) हा फरार आहे. आरोपी हे पुणे मनपाच्या क्षेत्रीय कार्यालय विश्रामबागवाडा (Regional Office Vishrambagwada) येथे कार्यरत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने 5 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने (वय-36) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कचरा मोटार बिगारी विभागात काम करत आहेत.
त्यांची नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी तसेच किटक विभागात बदली न करण्यासाठी मुकादम रवी लोंढे याने 15 हजाराची लाच मागितली.
तडजोडीमध्ये 10 हजार लाच देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी (दि.1) पडताळणी केली असता रवी लोंढे याने लाचेची रक्कम कचरा गाडीवरील कर्मचारी हर्षल अडागळे याच्याकडे देण्यास सांगितले.

एसीबीने शनिवारी सापळा रचून आरोपी हर्षल अडागळे याला तक्रारदार यांच्याकडून मुकादम रवी लोंढे
याच्यासाठी 10 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ (Pune Anti Corruption) पकडले.
आरोपींविरोधात खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्यातील आरोपी मुकादम रवी लोंढे हा फरार आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग (Police Inspector Alka Sarg) करीत आहेत.

Web Title :- Pune Anti Corruption | 2 employees of Pune Municipal Corporation caught taking anti-corruption bribe of Rs 10 thousands

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांचे निदान, लसीकरणाचा 20 लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Anti Corruption | बारामतीमध्ये महिलेकडून 30 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात;

Aamir Khan | आमीर खानच्या ‘त्या’ जाहिरातीवरुन ‘वादंग’, युझर्स म्हणाले – ‘तू हिंदू विरोधी आहेस’ (व्हिडिओ)