Pune Anti Corruption | 5 लाखाचं लाच प्रकरण ! पुण्यातील सहाय्यक निरीक्षकासह दोनजण 1 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी 5 लाखाची मागणी करुन 1 लाख रुपयाची लाच खासगी व्यक्तीकडून स्विकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला (API) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (Pune Anti Corruption Bureau) विभागाने रंगेहाथ (Pune Anti Corruption Trap) पकडले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहूल अशोक पाटील Rahul Ashok Patil (वय-33) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊसाहेब खांदवे Santosh Bhausaheb Khandve (वय-45 रा. लोहगाव) असे लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार (वय-22) यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (vimantal police station) फसवणूकीचा (Cheating) गुन्हा (FIR) दाखल आहे.
राहूल पाटील (API Rahul Patil) हे पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. संबंधित गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो.
असे सांगून सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि खासगी व्यक्ती खांदवे यांनी तक्रादार यांच्याकडे 5 लाखाची लाच मागितली.
संतोष खांदवे याने तक्रारदार यांच्यासोबत तडजोड करुन 3 लाखाची मागणी केली.
त्यापैकी 1 लाख रुपये आज देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार केली.
पथकाने पंचासमक्ष 7 आणि 8 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक राहूल पाटील यांनी लाचेची रक्कम संतोष खांदवे याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार पथकाने बुधवारी (दि.8) सापळा रचला.
संतोष खांदवे याला सहायक पोलीस निरीक्षक पाटील याच्यासाठी 1 लाखाची रक्कम स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पोलीस हवालदार अंकुश माने, पोलीस शिपाई दिनेश माने, महिला पोलीस शिपाई पूजा पागिरे, चालक पोलीस शिपाई राऊत यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Anti Corruption | 5 lakh bribery case! Two persons including an assistant inspector from Pune caught taking Rs 1 lakh in anti-corruption scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vegan Diet | FSSAI ने ‘वेगन’ फूडसाठी बनवले विशेष रेग्युलेशन, लोकांना ताबडतोब ओळखता येणार

Kolhapur Crime | धक्कादायक ! पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाखाची मागितली खंडणी

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा राणे पुत्रांना टोला; म्हणाले – ‘टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले’