Pune Anti Corruption | 8000 हजार रुपयाची लाच घेताना विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – नवीन तीन विज मीटरची जोडणी करुन एक ट्रान्सफर करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील (MSEDCL) प्रधान तंत्रज्ञ (Chief Technician) आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) सापळा रचून अटक (Pune Anti Corruption) केली. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आला.

प्रधान तंत्रज्ञ संदिप दशरथ भोसले Sandeep Bhosale (वय-38) आणि खासगी व्यक्ती हरी लिंबराज सुर्यवंशी (वय-22 रा. लोहगांव, पुणे) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत एका 50 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांनी तीन घरांचे बांधकाम केले आहे. यासाठी त्यांनी तीन वीज मिटर जोडणी करण्यासाठी आणि एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विश्रांतवाडी (Vishrantwadi) शाखेत अर्ज केला होता. या कामासाठी संदीप भोसले याने तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संदिप भोसले याने लाच घेण्याचे मान्य केले.
तसेच लाचाची रक्कम खासगी व्यक्ती हरी सुर्यवंशी याच्याकडे देण्यास सांगितली.
त्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून संदिप भोसले याच्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना सुर्यवंशी याला रंगेहाथ पकडले.
दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode),
अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Title : Pune Anti Corruption | A man along with an official of an electricity company was caught in an anti-corruption scam while accepting a bribe of Rs 8,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supreme Court | ‘सुप्रीम कोर्टा’ने केंद्राला सुनावले; म्हणाले – ‘कोरोना मृतांच्या वारसांना मदत कधी देणार?’

Nanded Crime | वडिलानेच आपल्या पोटच्या मुलीची केली 3 वेळा विक्री; नांदेड मधील धक्कादायक घटना

Shivsena MP Bhavana Gawali | शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ