Pune Anti Corruption | 20 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अँटी करप्शनकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Anti Corruption | गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी सुरुवातीला 50 हजाराची लाच (Demand for bribe) मागून तडजोडीत 20 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस शिपायाला पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) अटक (Arrest) केली आहे. पोलीस शिपाई करणसिंग निहालसिंग जारवाल Karan Singh Nihal Singh Jarwal (वय-21) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur police station) जारवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी जानेवारीमध्ये एक जुने जेसीबी मशीन (JCB machine) चार लाख रुपये डिपॉझिट देवून चालवण्यासाठी घेतला होता. त्यावेळी शिरुर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई करणसिंग जारवाल यांनी तक्रारदार यांना जेसीबी चोरीच्या (Theft) गुन्ह्यातील असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी जेसीबी शिरुर पोलीस ठाण्यात जमा केला होता.

 

 

 

 

त्यावेळी जारवाल यांनी तक्रारदार यांना ज्यांच्याकडून जेसीबी मशीन घेतले त्यांच्यावर चोरीचा गुन्हा (FIR) दाखल केला असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार यांना चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी सुरुवातीला 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption) तक्रार केल्यानंतर पथकाने 6 ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यामध्ये जारवाल यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जारवाल हे सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन (Lonavala Rural Police Station) येथे नेमणुकीस असून लाचेच्या प्रकरणात त्यांना सोमवारी (दि.4) अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे (Police Inspector Sandeep Varhade) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Additional Superintendent of Police Suraj Gurav),
सुहास नाडगौडा (Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

Web Title : Pune Anti Corruption | Anti-corruption officer arrested for demanding Rs 20,000 bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update