Pune Anti Corruption | पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक 5 लाखाच्या लाच प्रकरणी ‘गोत्यात’, एक लाख घेताना झाला ट्रॅप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Anti Corruption | पुणे पोलिस आयुक्तालयातील विमानतळ पोलिस ठाण्यातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि एक खासगी व्यक्ती 1 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी गोत्यात आले आहेत. 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारे 3 लाख रूपयांवर सेटल झाले आणि 1 लाख रूपयाची लाच घेताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात (Pune Anti Corruption) अडकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाची कारवाई अद्याप सुरू असून आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची
प्रक्रिया तसेच इतर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शनमधील
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.
विमानतळ पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक लाच प्रकरणी गोत्यात आल्याने
शहर पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, थेट सहाय्यक पोलिस निरीक्षकाने 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केल्यामुळे
अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
3 लाख रूपयांवर सेटल झाल्यानंतर 1 लाख रूपयाची लाच स्विकारताना खासगी व्यक्ती
अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे.

ही कारवाई पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे (Rajesh Bansode, Superintendent of Pune Anti-Corruption), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Upper Superintendent Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Upper Superintendent Suhas Nadgauda), उपाधिक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
दरम्यान, लाच प्रकरणी आणखी कोण सहभागी आहे काय याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अ‍ॅन्टी करप्शनमधील सुत्रांनी दिली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकाने थेट 5 लाखाचा आवाज टाकल्यामुळे शहर पोलिस दलामध्ये उलट-सुटल चर्चा सुरू आहे.

 

Web Title : Pune Anti Corruption | Assistant Inspector at Pune Airport Police Station caught taking Rs 1 lakh in bribery case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCP Meeting | राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांबद्दल नाराजी

Mumbai MNS | ‘मनसे’ची मुंबईमध्ये पोस्टरबाजी ! खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?