Pune Anti Corruption | पुण्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यासह समिती सदस्य 50 हजाराच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेमधील (Pune Zilla Parishad) गट शिक्षण अधिकाऱ्याला 50 हजार रुपयाची लाच स्विकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) सापळा रचून रंगेहाथ (Pune Anti Corruption) पकडले. पुण्यात केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. रामदास शिवनाथ वालझडे (Ramdas Walzade) (वय- 50) आणि हवेली आरटीई प्रवेश पडताळणी समिती सदस्य विकास नंदकुमार धुमाळ (वय-40) असे लाच (Accepting Bribe) घेताना अटक (Arrest) करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे.

तक्रारदार (वय-40) यांच्या मुलीला हडपसर येथील विसडम वर्ल्ड स्कूलमध्ये (Wisdom World School Hadapsar) आरटीई (RTE) अंतर्गत मोफत प्रवेश देण्यासाठी वालझडे याने 50 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकातील अधिकाऱ्यांनी पडताळणी करुन बुधवारी (दि.1) सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून हवेली पंचायत समिती कडून शालेय शिक्षण प्रवेशासाठी गठिक करण्यात आलेल्या आरटीई प्रवेश पडताळणी समिती सदस्य विकास धुमाळ (Vikas Dhumal) याला वालझडे याच्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (Addl Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार (DySp Vijaymala Pawar),
पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Inspector of Police Bharat Salunkhe),
महिला पोलीस शिपाई सुप्रिया कादबाने, शिल्पा तुपे, पोलीस शिपाई किरण चिमटे, चालक पोलीस शिपाई प्रशांत वाळके यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे
तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title : Pune Anti Corruption | Committee members, including group education officer in Pune, caught in anti-corruption scam in bribery case of Rs 50,000