Pune Anti Corruption | 40 हजाराची लाच घेणार्‍या पुणे मनपाच्या उप अभियंत्यास पोलिस कोठडी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Anti Corruption | शाळा आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याला विशेष न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलिस (Pune Anti Corruption) कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा, आदेश दिला.

सुधीर विठ्ठल सोनावणे Sudhir Vitthal Sonawane (वय 51, रा. टिंगरेनगर) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी 2018-19 मध्ये महापालिकेच्या (Pune Corporation) तीन शाळा आणि करोना काळात स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम केले होते.

शाळांच्या दुरुस्तीचे बिल मंजूर करण्यासाठी आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून उपअभियंता सोनावणेने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यातील 40 हजार रुपये स्विकारताना सोनावणेला अटक करण्यात आली.
सोनावणे याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता आहे का,
त्याबाबत तपास करायचा आहे, आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे,
आरोपीने लाचेची मागणी स्वत:साठी की अन्य कोणासाठी केली होती, याचा तपास करायचा आहे,
त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे (Public Prosecutor Ramesh Ghorpade) यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title : Pune Anti Corruption | Deputy Engineer of Pune Municipal Corporation arrested for taking bribe of Rs 40,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update