Pune Anti Corruption | बारामतीमध्ये महिलेकडून 30 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात;

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Anti Corruption | सावकारी कायद्यानुसार दाखल असेलल्या गुन्ह्याचे चार्जशिट (Chargesheet) तक्रारदार यांच्या बाजूने पाठवण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीकडून 30 हजार रुपयाची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Anti Corruption Trap) रचून अटक केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) सहायक पोलीस उपनिरीक्षक संदिपान अभिमान माळी Sandipan Abhiman Mali (वय-56) असे लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संदिपान माळी हे बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर तक्रारदार यांच्या पत्नीने एकाविरुद्ध सावकारी कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या गुन्ह्याचे चार्जशीट त्यांच्या बाजूने पाठवण्यसाठी माळी यांनी तक्रारदार यांच्या पत्नीकडे 40 हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीमध्ये 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार रविवारी (दि.3) 30 हजार रुपयाची लाच स्वीकारताना माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Additional Superintendent of Police Suraj Gurav),
सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक (Deputy Superintendent of Police Seema Adnaik),
पोलीस निरीक्षक भारत साळुंके (Police Inspector Bharat Salunke), पोलीस हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकुर, चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Anti Corruption | pune anti corruption arrested policeman of baramati while taking bribe of 30 thousands

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aamir Khan | आमीर खानच्या ‘त्या’ जाहिरातीवरुन ‘वादंग’, युझर्स म्हणाले – ‘तू हिंदू विरोधी आहेस’ (व्हिडिओ)

Maharashtra Rains | पुढचे 5 दिवस कोकणासह घाट परिसरात मुसळधार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

Pune Crime | झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरायचा दुचाकी, पण ‘असा’ सापडला गुन्हे शाखेच्या जाळ्यात