Pune Anti Corruption | पुण्यातील दोन पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Anti Corruption | पुणे ग्रामीण पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह (ASI) एका पोलिस नाईकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. दोन पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या (Pune Anti Corruption) जाळयात सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती माणिक कोलते (Assistant Sub-Inspector of Police Shripati Manik Kolte) आणि पोलिस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप (Police Naik Shivaji Balasaheb Jagtap) अशी कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
शिवाजी बाळासाहेब जगताप यांना 10 हजार रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने दोघांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption) दोघांची तक्रार केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरूध्द हवेली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे.
त्या गुन्हयात तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी आरोपी सहाय्यक उपनिरीक्षक श्रीपती कोलते यांनी 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अन्टी करप्शनकडे तक्रार दाखल केली.

 

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक कोलते हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला.
पोलिस नाईक शिवाजी जगताप यांनी कोलते यांच्या सांगण्यावरून 10 हजार रूपयाची लाच घेतली.
त्यावेळी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर (Police Inspector Sunil Kshirsagar) , पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) , कर्मचारी दिनेश माने, सौरभ महाशब्दे, चालक अभिजीत राऊत यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : Pune Anti Corruption | Two police personnel in Pune in the net of anti-corruption, huge commotion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्याच्या महिला पत्रकाराचा पोलीस ठाण्यात ‘राडा’ !

MVA vs BJP | ‘भाजप-मविआ’मध्ये आरोपांचे राजकीय शीतयुद्ध; फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार ‘महाविकास’ सरकार बाहेर काढणार?

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर