
Pune Anti Corruption | 30 हजाराची लाच घेताना पुण्यातील तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Anti Corruption | हक्क सोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर करण्यासठी 50 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना (Accepting Bribe) चऱ्होलीच्या (Charholi) तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) सापळा रचून अटक केली. मारुती अंकुश पवार Maruti Ankush Pawar (वय-41) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (दि.27) करण्यात आली.
याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांच्याकडील मृत्यूपत्राची व हक्क सोडपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करायची होती.
नोंद करुन देण्यासाठी तलाठी मारुती पवार याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीमध्ये 30 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी एसीबीकडे (ACB) तक्रार केल्यानंतर 23 आणि 24 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत पवार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी (दि.27) सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपयाची लाच स्विकारताना मारुती पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपी मारुती पवार याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात (Dighi police station) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl Suraj Gurav), सुहास नाडगौडा
(Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
Web Title : Pune Anti Corruption | While taking bribe of Rs 30,000, Talathi was caught in the trap of anti-corruption in Pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lonand Railway Accident | दुर्देवी ! रेल्वेच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू
Hinjewadi-Shivajinagar Metro | प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मिळाला ‘मुहूर्त’
Kirit Somaiya | हसन मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही – किरीट सोमय्या