Pune : 4 पोलीस निरीक्षकांसह 12 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, अखेर गुन्हे शाखेतील ‘सासू’ला ‘वारस’ मिळाला ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात बदलून आलेल्या आलेल्या पोलीस निरीक्षकांसह 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदलीचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, आज नियुक्त्या करण्यात आलेल्यांपैकीच एका पोलीस निरीक्षकाची गुन्हे शाखेच्या ‘सामाजिक’ सुरक्षा (सासू) विभागात नियुक्ती होणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात गेल्या आठवडाभरापासून आहे. गेल्या 4-5 वर्षात ‘सासू’ विभागात काम करणाऱ्यांनी पोलीस दलावर अपार ‘माया’ केली आहे हे सर्वश्रुत आहे.

बदलून आलेले अधिकारी व त्यांची पद स्थापना

पोलीस निरीक्षक शैलेश संखे (नागपूर ते गुन्हे शाखा), सुनील जैतापूरकर (रायगड ते विशेष शाखा), विजय खोमणे (अमरावती ते पोलीस निरीक्षक गुन्हे दत्तवाडी), रजनीश निर्मल (गडचिरोली ते गुन्हे शाखा), राजू अडागळे (नवी मुंबई ते पोलीस निरीक्षक गुन्हे हडपसर)…

सहाय्यक पोलीस निरीक्षक विधा जाधव (कोल्हापूर ते आर्थिक गुन्हे शाखा), शिवदास लहाने (परभणी ते विमानतळ पोलीस ठाणे), नागेश भास्कर (गोंदिया ते बॉम्ब शोधक व नाशक पथक), राकेश कदम (वि. सु. वी ते जलद प्रतिसाद पथक), संतोष कोळी (सिंधुदुर्ग ते चतुशृंगी पोलीस ठाणे), शिरीष भालेराव (मुंबई शहर ते आर्थिक व सायबर), चंद्रकांत वाबळे (सोलापूर शहर ते विश्रामबाग पोलीस ठाणे)

उपनिरीक्षक सुरेश चौधर (नव्याने हजर ते समर्थ पोलीस ठाणे)