Pune : वालचंद संचेती यांची पुणे माथाडी बोर्डावर नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दि पूना मर्चंट्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वालचंदजी संचेती यांची महाराष्ट्र शासनाने पुणे माथाडी बोर्डावर नियुक्ती केली आहे.

माथाडी बोर्डाच्या स्थापनेपासून संचेती बोर्डाच्या कामात कार्यरत आहेत. दि पूना मर्चंट्स चेंबर्सच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. कँप एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी आणि ओसवाल बंधू समाज कार्यालयाच्या अध्यक्षपदीही संचेती आहेत. याखेरीज सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांशीही त्यांचा निकटचा संबंध आहे.

You might also like