पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडीची शक्यता, राष्ट्रवादीची ‘एवढ्या’ जागांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. जागावापटपामध्ये पुण्यातील ८ पैकी ६ जागांची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. तर कॉंग्रेसनेही या जागांवर दावा केला आहे. त्यात कॉंग्रेसने फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्यूला अवलंबण्याची मागणी करत ४-४ जागांवर लढण्याची तयारी दर्शवली आहे.

कॉंग्रेसकडून या ४ जागांवर दावा

पुण्यातील ८ पैकी ४ जागांची मागणी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यकारिणीच्या बैठकित केली आहे. पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोनमेंट, पर्वती या मतदारसंघांची मागणी केली आहे. २०१४ च्या निवडणूकीत कॉंग्रेस शिवाजीनगर, कसबा कॅन्टोनमेंट या मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर पर्वती मतदारसंघात सेनाचा तत्कालीन दुसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार कॉंग्रेसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीकडून या ६ जागांची मागणी

८ पैकी ६ मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे पुण्यातील ८ पैकी हडपसर, खडकवासला, पर्वती, वडगाव शेरी, कोथरुड, शिवाजीनगर हे सहा मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा